शेअर मार्केट बद्दल माहिती
गुंतवणूक
गुंतवणूक म्हणजे अशी मालमत्ता जी आपण आपला पैसा सुरक्षितपणे वाढवण्यासाठी तयार करत असतो.
गुंतवणूक करणे म्हणजे पैशापासून पैसा कमवण्याचा प्रयत्न करणे होय.
सुरक्षितता
गुंतवणुकीचा आपला पहिला नियम आहे सुरक्षितता म्हणजेच आपण जिथे कुठे गुंतवणूक करणार आहोत तिथे आपली गुंतवणूक सुरक्षित असली पाहिजे.
बरेच लोक राष्ट्रीय बँकेत जसे कि स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, HDFC, ICICI इ. अशा मोठ्या बँकेत आपले पैसे गुंतवणे पसंत करतात.
लिक्विडीटी
लिक्विडीटी म्हणजे आपण ज्या कुठल्या साधनात आपले पैसे अडकवणार आहोत त्या साधनांतून आपले पैसे आपल्याला अगदी सुलभतेने परत घेता आले पाहिजे.
उदा. आपण आपले पैसे सेव्हिन्ग अकाउंटमध्ये ठेवल्यास आपण एटिएम वापरून, चेक वापरून तात्काळ आपले पैसे वापरायला काढू शकतो.
याउलट आपण आपले पैसे जमीनजुमला, घर, किंवा फ्लॅट थोडक्यात रिअल इस्टेटमध्ये अडकवल्यास आपल्याला आपले पैसे परत मिळवायचे असल्यास थोडे अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
परतावा
गुंतवणुकीचे तिसरे उद्दिष्ट्य म्हणजे आपण गुंतवलेल्या पैशावर चांगला परतावा मिळवणे.
आपले पैसे आहे तेवढेच राहिले तर महागाईच्या ओघात एक दिवस आपले पैसे एक दिवस नाममात्र गुंतवणूक किंवा बचत म्हणून शिल्लक राहतील तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवणे महत्वाचे ठरते.
परतावा किंवा प्रॉफिट मिळवणे म्हणजे पैशातून पैसा कमवणे किंवा पैशालाच कामाला लावणे असे आपण म्हणू शकतो.
परतावा हि जरी तिसरी पायरी असली तरी गुंतवणुकीवर वाढणाऱ्या महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळवणे गरजेचे आहे हे लक्षात असू द्या.
आपल्याकडे महागाईचा दर सर्वसाधारणपणे ४% ते ५% एवढा आहे आणि बचत खात्यावर आपल्याला बँक ३.५% -४% व्याज देत असेल तर आपली गुंतवणूक तोट्यात चालली आहे हे नक्की समजावे.
सुलभता
आपण ज्या कुठल्या साधनात गुंतवणूक करणार आहोत त्या साधनात गुंतवणूक करण्याची पद्धत सहज सोपी असावी म्हणजेच कमी गुंतागुंतीची असावी असे असल्यास अधिक चांगले होईल.
अनेकदा गुंतवणुकीचे साधन किचकट असल्यास आपण त्याकडे कानाडोळा करतो त्यामुळे गुंतवणुकीचे साधन निवडताना आपण सुलभ साधनाची निवड करावी.
उदा. सुरवातीला बँक अकाउंट उघडण्यासाठी बँकेत प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे जमा करावी लागत आता मात्र ऑनलाईन अकाउंट उघडणे शक्य असल्याने अनेक लोक अकाउंट उघडत आहे.
आपल्याला जर गुंतवणूक म्हणून एखादे घर खरेदी करायचे असेल तर आपल्याला घराची कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे आणि घर खरेदी करण्याची कायदेशीर प्रक्रिया देखील पार पाडणे गरजेचे आहे.